मकाईत युवकांच्या पॅनेल सोबत पात्र उमेदवार ; प्रशासन मुद्दाम वेळ खातय
प्रतिनिधी | करमाळा
मकाईचा निकाल मुद्दाम टाळला जातोय. जेणे करुन आम्हाला पुढे दाद मागण्यासाठी वेळ कमी पडावा आणि त्यातुन एक प्रकारे सत्ताधाऱ्यांचा फायदा करण्याचा उद्देश प्रशासनाचा आहे. पण तरीही आम्ही लढतोय. तसेच आज आमच्याकडे निकाला पुर्वीही सहा उमेदवार पात्र आहेत. शिवाय बाकीचे उमेदवार पात्रही होतील. पण आमचे पॅनल स्वतंत्र असणार आहे.

यामध्ये सवितादेवीराजे भोसले याही आहेत. आमच्या पॅनलचे नाव शेतकरी व कामगार विकास पॅनल असे आहे. जे उमेदवार माझ्याकडे आहेत म्हणतात ते चुकीचे आहे उद्या ते नेतेमंडळी आमच्यासोबत येतीलही पण खरे पात्र उमेदवार हे आमच्यासोबत आहेत अशी माहीती पॅनल प्रमुख संतोष वाळुंजकर व कुणाल पाटील यांनी सांगितले.
लोकांच्या अडचणी कामगारांचे प्रश्न शेतकऱ्यांचा विचार करुन आम्ही लढा उभा करण्याचे ठरवले यासाठी आम्ही लढत राहणार आहे. हा लढा आमचा नसुन हा लढा लोकांसाठी आहे. त्यामुळे विजय नक्की होणार आहे. त्यांनी पुर्ण प्रशासन मॅनेज केले आहे. खोटे केल्याने लोकशाही संपेल असेही यावेळी वाळुंजकर व पाटील म्हणाले.

जर निवडणुक जिंकु शकता तर घाबरता कशाला निवडणुकांना सामोर जावा . मतदार कोणाला कौल देतील हे पाहु असे आवाहन या युवकांच्या संघटनेने केले आहे.
यावेळी सुनिता गिरंजे, बाबुराव अंबोदरे, आप्पासाहेब जाधव, गणेश चौधरी, सुभाष शिंदे हे पात्र उमेदवार आपल्यासोबत असल्याचे पॅनल प्रमुखांनी सांगितले.
कुणाल पाटील, संतोष वाळुंजकर, विशाल पाटील, दादासाहेब तनपुरे, प्रकाश गिरंजे, कैलास कोकरे, अंकुश भानवसे, गणेश कांबळे, विशाल शिंदे, नंदकुमार पाटील, आप्पासाहेब जाधव, सोमनाथ शिंदे, आबा चिंचकर, अमित केकान, सुधीर साळुंखे आदि उपस्थित होते.