करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

ज्या शाळेत मनापासून प्रेम करणारे शिक्षक नसतील त्या शाळा वैभवशुन्य आहेत

करमाळा – विशाल घोलप

आजचा सन्मान फक्त सन्मान नसुन तर सन्मानाच्या शालीसोबत आणखी चांगले काम करण्याची जबाबदारी आपल्या खाद्यावर टाकत आहोत. आदर्श काम करत शिक्षकांनी एक चांगले वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे विद्यार्थी सर्वत्र झेंडे रोवतील. जिल्ह्यातील आकरा तालुक्याबरोबर करमाळा तालुक्याचे योगदान राहिल असा विश्वास यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी व्यक्त केला. तर अनेक अडचणीतुन चांगले काम करण्याची मानसिकता असेल तर नक्कीच शाळा नावलौकीक मिळवेल. सर्व सुविधा असतानाही ज्या शाळेत मनापासून प्रेम करणारे शिक्षक नसतील त्या शाळा वैभवशुन्य आहेत असेही शेख म्हणाले.

बुधवारी सकाळी पंचायत समीती कार्यालयात तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना मनोज राऊत म्हणाले की, प्रत्येकाच्यात अनेक आदर्श गुण आहेत. त्यातील एक जरी आपण विद्यार्थ्यांत उतरवला तरी तुम्ही आदर्श शिक्षक आहात. शिक्षक असोत किंवा शासकीय कर्मचारी हे पगार मिळतोय म्हणून काम करत नाहीत तर आपण जे काम करतोय यातुन आनंद मिळतोय म्हणुन आपण काम करतोय त्यामुळे आपण कोणासाठी काम करत नसुन स्वतःसाठीच करतोय हे लक्षात घेतले पाहिजे. पुर्वी गरीबी मुळे शिक्षण मिळत नव्हते आई वडीलांना जबाबदार धरले जायचे पण आज काल शिक्षण प्रत्येकला दिले जात आहे. येणाऱ्या काळात शिक्षकामुळे आमचे शिक्षण अपुर्ण राहिले असे सांगणारे विद्यार्थी तयार होऊ नये यासाठी आपणच लक्ष दिले पाहिजे त्यांच्यातील कलागुण व आपल्यातील आदर्शगुण त्यांना देऊन एक चांगला नागरीक घडवणे आपले काम आहे असेही राऊत म्हणाले.

यावेळी कार्यक्रमात पंचवीस शिक्षकांचे व तीन शाळांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये आदर्श शिक्षक व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कारप्राप्त शाळांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल यादव व निशांत खारगे यांनी केले तर आभार जयवंत नलवडे यांनी मानले.

पुरस्कार प्राप्त शाळा व शिक्षक …
प्रभावती जगताप (जातेगाव), अंजली निमकर (श्रीदेवीचामाळ), विश्वनाथ निरवणे (राखवाडी), भागवत गर्जे (झरे), चंद्रहास चोरमले (वीट), शीतल कांबळे (सालसे), कीर्ती भापकर (वरकटणे), मीराबाई जाधवर (पाडळी), खालील खान (घारगाव), मनीषा गायकवाड(भिवरवाडी), मनीषा आदलिंगे (वांगी क्रमांक २), लक्ष्मण भंडारे (चांदणे वस्ती), रामदास काळे (फडतडे वस्ती), रमेश कोडलिंगे (सातोली), रवींद्रकुमार पवळ (सोगाव पश्चिम), राजू भोंग (देलवडी), महेश आरडे (घरतवाडी), हरिश्चंद्र कडू (श्रीदेवीचा माळ), नानासाहेब मोहिते (सोगाव पश्चिम), गंगू खताळ (वांगी क्रमांक एक), मन्नान मोमीन (हिसरे), सिताराम भिल (उमरड), महादेव यादव (देवळाली), हनुमंत ढेरे (गटसाधन केंद्र करमाळा), सुग्रीव नीळ (पंचायत समिती) करमाळा असे पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आहेत. तर गोयेगाव शाळा पहिला, उमरड दुसरा तर खातगाव क्रमांक दोन – तिसरा क्रमांकमिळवला त्याबद्दल सन्मान झाला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE