मकाई छाननीच्या दरम्यान आवाटी कार्यकर्त्यांचा उत्साह ; पोटनिवडणुकीत विरोधी गटातील उमेदवार विजयी
करमाळा:
तालुक्यातील आवाटी व साडे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. करमाळा तहसील कार्यालय येथे आज (शुक्रवारी) सकाळी मतमोजणी झाली. साडे येथे पाटील गटाचा तर आवाटी येथे संजयमामा शिंदे यांचा उमेदवार निवडुन आला. आवाटी येथे बागल जगताप सत्ता ६-३ होती. तर याठिकाणी संजयमामा व पाटील गटाचा उमेदवार निवडुन आल्याने येथे ५-४ असा बलाबल झाले आहे.

साडे तालुका करमाळा येथे एका जागेसाठी झालेल्या निवडणुकी पाटील गटाच्या दत्तात्रय चव्हाण यांनी बाजी मारली असून विजय संपादन केला आहे. या ठिकाणी दत्तात्रय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवड झाल्यानंतर पाटील गटाच्या सदस्य संख्या वाढ झाल्याचे दिसून येते.

तर आवाटी येथे झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी बागल – जगताप युतीच्या उमेदवाराचा पराभव करीत संजयमामा गट व पाटील गटाच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. या ठिकाणी भक्ती नलवडे यांचा विजय झाला आहे.
साडे प्रभाग पाच : अण्णा पोळके ९६, दत्तात्रय चव्हाण १६६, भारती चव्हाण १४६ ल नोटा ९.
आवाटी प्रभाग एक : भक्ती नलवडे ३०४, सुवर्णा नलवडे २६६ व नोटा सहा. निवडणुक निर्णय अधिकारी सादीक काझी व सहाय्यक म्हणून महालिंग बिराजदार ल धनाजी जाधव यांनी काम पाहिले.