करमाळासोलापूर जिल्हा

मोजणीचे प्रलंबीत प्रश्न तीन महिण्यात मार्गी लागणार ; गावोगावी होणारे तंटे थांबणार – विखे पाटील

करमाळा प्रतिनिधी


राज्य व केंद्रात समविचारी सरकार असल्यानंतर कसे बदल घडतात हे आता तुम्हाला दाखऊन दिले आहे. कृषी क्षेत्रात आज पर्यतची सर्वात मोठी गुंतवणुक नरेद्र मोदींच्या काळात झाली आहे. महाराष्ट्र शासनही शेतकऱ्याला स्थैर्य मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शेतीच्या माध्यमातुन होणारे वाद हे जमीन मोजणी मुळे व्हायचे आता याचाही तोडगा काढला आहे. केवळ तीन महिण्यात सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत तर शेतकऱ्याच्या घरी नकाशे पोहच करण्याचे काम होईल त्यामुळे वाद थांबणार आहे अशी माहीती महसुल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली तर यावेळी फेसबुक मधुन बाहेर पडलेच नाहीत त्यामुळे महाराष्ट्र मागे राहिला अशी टिका केली ठाकरेंबाबत बोलताना केली.

रविवारी सकाळी आकरा वाजता करमाळ्यात स्व. दिगंबरराव बागल यांच्या जयंती निमित्ताने आयोजीत शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आ. रणजीतसिह मोहिते, आ. सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विद्या विकास मंडळाच्र सचिव विलासराव घुमरे, गौरव कोलते, साखर संघाच्या संचालीका रश्मी बागल, शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, बाजार समीती उपसभापती चिंतामणी जगताप व प्रतिष्ठानचे प्रमुख विजय लावंड आदि उपस्थीत होते. यावेळी स्वागताध्यक्ष दिग्विजय बागल यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. कार्यक्रमाला पदाधिकाऱ्यांसह, अधिकारी व शेकडो शेतकरी उपस्थीत होते.

पुढे बोलताना विखे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी स्वतःच्या जिल्ह्यासाठी पळवणाऱ्या नेत्यांना आपण डोक्यावर घेऊन नाचत होतो आता जनतेने त्याना ओळकले आहे असे म्हणत पवारांचे नाव न घेता पुण्याचे नेते म्हणत त्यांच्यावरही विखे पाटलानी हल्ला चढवला होता. तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश बलवान होत आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी जवळपास वीस ळाख कोटी रुपयांचा गुंतवणुक केली आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा शेतकरी सक्षम करण्यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत.तालुक्यातील आदिनाथ व मकाई कारखान्याला शासनाच्या वतीने मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जास्तीत जास्त मदत करू असे आश्वासनही दिले.

नेत्यांकडुन विविध मागण्या ….
बोलताना आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी जातेगाव ते टेंभुर्णी हा रखडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात पालकमंत्री विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी कडून हा प्रश्न मार्गी लावावा. शिवाय करमाळा शहरातील ३५० व कुर्डुवाडी मधील ४८० घरांना निमवाकुल करायचे आहे. चिखलठाण, ढोकरी, कुगाव, वाशिंब्यासह सात गावात जलमार्गासाठी बोट व जागा उपलब्ध आहे पण धक्का बांधुन द्यावा अशा मागण्या केल्या तर यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी डिकसळ पुलाची दुरस्ती करण्याची मागणी केली. दिग्विजय बागल यानी कारखाने अडचणीतुन निघण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE