राज्यातील सत्तांतरानंतरही आ. संजयमामा शिंदे गटातील इनकमिंग सुरूच
प्रतिनिधी
मौजे -हिंगणी ता.करमाळा येथील बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी आज विठ्ठल कार्पोरेशन,म्हैसगांव येथे विकासप्रिय आमदार मा.संजयमामा शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. यावेळी पार्टी प्रमुख मा.बबनराव आण्णा जाधव (चेअरमन) यांच्या नेतृत्वाखाली मा.मधुकर जाधव (व्हा.चेअरमन), तसेच जाधव पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांनी प्रवेश केला.

यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक मा.अशोकबापू पाटील, ॲड.अजित विघ्ने, मा.तानाजीबापू झोळ,हिंगणी गावचे सरपंच मा.हनुमंत बाबर-पाटील,मा.सुजीततात्या बागल,केतूरचे उपसरपंच मा.प्रशांत नवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.लक्ष्मीकांत पाटील,मा.राजेंद्र बाबर उपस्थित होते.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज भरत जाधव, संपतराव जाधव, महादेव बाबर ,रामचंद्र जाधव, शंकर जाधव ,सचिन जाधव ,नितीन जाधव ,नागनाथ जाधव ,प्रकाश जाधव, विनोद जाधव, रामचंद्र बाबर, हिरालाल गायकवाड, भास्कर गवळी ,अंगत बाबर, भास्कर बाबर, लक्ष्मण पवार, शकील शेख, अक्षय मोरे , सागर मांढरे ,अंकुश बाबर ,महेश जाधव, सुदर्शन जाधव, विजय जगताप ,आश्रम जगताप , केशव जाधव ,संदेश जाधव, बाबासाहेब गलांडे, दत्तात्रय तावरे, पप्पू शिंदे ,नवनाथ जगताप आदी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, ज्या विश्वासाने हिंगणी येथील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे, त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता गावातील अडचणी आपण प्राधान्याने सोडवणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.