करमाळासोलापूर जिल्हा

शिवसेनेच्या (शिंदे गट) नव्या निवडी जाहीर ; तर नगरपरिषद स्वबळावर लढवण्याचा निर्धार

करमाळा


हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर काम करणारे शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची पक्ष बांधणी करमाळा तालुक्यात मजबूत करणार असून माजी आमदार नारायण पाटील यांना पुन्हा विधानसभेत पाठवण्यासाठी तालुक्यातील शिवसैनिकांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन शिवसेनेचे (शिंदे गट) महेश चिवटे यांनी केले.

शिवसेनेतील शिंदे समर्थक कार्यकर्त्यांची आज शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कार्यालयात बैठक झाली. यावेळी मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपर्कप्रमुख आमदार तानाजी सावंत व माजी आमदार नारायण पाटील, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा शहर प्रमुख म्हणून संजय शीलवंत उपशहर प्रमुख म्हणून राजेंद्र काळे व नागेश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली. जेऊर शिवसेना वैद्यकीय मदत पक्ष समन्वयक म्हणून गणेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी करमाळा शहरातील सर्व 20 वार्डातून शिवसेनेचा शाखेचे उद्घाटन येत्या महिन्याभरात करण्याचे निश्चित करण्यात आले. करमाळा तालुक्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडीच्या सर्व निवडी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन करण्यात येणार असल्याची माहिती महेश चिवटे यांनी दिली.

संजय शीलवंत
नूतन शहर प्रमुख
(शिवसेना शिंदे गट)
येणाऱ्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व वीस जागा लढविण्याची तयारी शिवसेनेने केली असून येणाऱ्या काळात समविचारी पक्ष सोबत आले तर युती करण्यासाठी सुद्धा तयारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा शहरातील शिवसेना मजबूत करून शहरातील सार्वजनिक प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही यावेळी संजय शीलवंत यांनी दिली.

शिवसेनेमध्ये  (शिंदे गट) ज्यांना पदाधिकारी होऊन काम करून समाजसेवा करायची आहे अशा कार्यकर्त्यांनी संपर्क साधावा असे आव्हान उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे. शिवसेना महिला आघाडीची सुद्धा नव्याने बांधणी होणार असून इच्छुकांनी शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाशी संपर्क साधावा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE