करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी खर्च निरिक्षक दाखल ; तक्रारीसाठी संपर्क साधा

करमाळा समाचार 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने करमाळा विधानसभा मतदारसंघाकरिता निवडणूक खर्च निरीक्षक सोलापूर शहरात दाखल झाले आहेत. दरम्यान नामनिर्देशित उमेदवार यांच्या खर्चासंबंधी कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योती किरण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) अंजली मरोड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार करमाळा शिल्पा ठोकडे यांनी केले आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हास्तरीय समित्यांचे नोडल अधिकारी, जिल्हयाच्या सर्व ११ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी.

politics

निवडणूकीच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराच्या खर्चाच्या प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराच्या खर्चाच्या प्रत्येक बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून तो खर्च संबंधीत उमेदवाराच्या खर्च नोंदवहीत नोंदवला गेला पाहीजे याची दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक के.पी. जयकर, तेजाराम मीना, बी. ज्योती किरण यांनी दिले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE