पोथरे येथे निर्यातक्षम केळी उत्पादन कार्यशाळा संपन्न
करमाळा –
मंगळवारी २ ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील पोथरे गावामध्ये महात्मा गांधी जयंती (जागतिक अहिंसा दिन) व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त केळी लागवड मार्गदर्शन व महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत अनुदान माहिती देण्यात आली. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन २०२४-२५ अंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शन कृषी सहायक गणेश माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावाचे सरपंच अंकुश शिंदे, ग्रामसेवक दरोडे भाऊसाहेब, कृषी सहाय्यक नितीन जाधव, कृषी सहाय्यक शरद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य पाराजी शिंदे , संतोष ठोंबरे व शेतकरी बांधव उपस्थित होते.
