शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना आजही सुरुच ; शेतकऱ्यांना केले आवाहन
करमाळा समाचार
मकाई चे चेअरमन तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलेला शब्द पाळला आहे. तालुक्यात आणि तालुक्या शेजारी मोठे सहकारी साखर कारखाने त्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे हे पाहून सुद्धा कारखान्याच्या फायद्यासाठी 1 – 2 महिने आधीच कारखाने बंद केले. पण मकाई कारखाना काही दिवस झाले 800 कपॅसिटी ने चालून स्वतःचे नुकसान होत आहे हे माहीत असून सुद्धा फक्त आणि फक्त तालुक्यातील सभासद आणि ऊस उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी चालू आहे.

10 तारखेला मकाई कारखान्याचा गाळप हंगाम होणार आहे. कमी ताकतीचा कारखाना असून सुद्धा सभासदांचा आणि तालुक्यातील ऊस उत्पादकांचा विचार करू आतापर्यंत चालू आहे. जितकी शक्य आहे. तेवढे कारखान्यांनी प्रयत्न करावा जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांची अडचण सोडवली आहे.

याबाबत बागल यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. या दोन दिवसांमध्ये ज्यांची कोणाचे ऊस राहिले आहेत. त्यांनी आपल्या इथल्या टोळ्यांचे नियोजन करून कारखान्यापर्यंत घेऊन यावे असे सांगितले आहे.