क्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

बनावट डॉक्टरला काल अटक तर आज जामीन मंजुर

करमाळा समाचार

करमाळा शहरात जीन मैदानासमोर खाजगी गाळ्यामध्ये कमलाई क्लिनिक नावाने दवाखाना चालवत असलेल्या निखिल बिश्वास (वय ६८) रा. महिंद्रनगर यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय परवाना नसताना दवाखाना चालू केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना काल दि ५ रोजी अटक करण्यात आली होती. तर आज जामीन मंजुर करण्यात आला आहे.

कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना मुळव्याध, भगंदर, स्किन स्पेशलिस्ट म्हणून काम करत असलेल्या बनावट डॉक्टरला काल ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्याकडून बेकायदा विक्री करण्यास आणलेले औषध गोळ्या मिळून आल्या आहेत. सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्या बोगस डॉक्टरला आज न्यायालयात उभे केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बिश्वासच्या बाजुने ॲड. के. व्ही. वीर व ॲड. व्ही. व्ही. बागल , ॲड. अक्षय वीर यांनी काम पाहिले. सरकारी वकील म्हणुन ॲड. एस. आर. जोशी यांनी काम पाहिले.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE