ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या 12वीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
उमरड(नंदकिशोर वलटे)
करमाळा शहरात सुरू असलेल्या विज्ञान शाखेच्या ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचा इयत्ता बारावीच्या विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ काल उत्साहात संपन्न झाला. या वेळी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे व पवार हॉस्पिटलचे डॉ.रविकिरण पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच पोलीस पाटील संघटनेचे सचिव पत्रकार विजय निकत व अध्यक्ष प्रताप पाटील उपस्थित होते.

सकाळपासून सुरू असलेल्या विविध गुणदर्शच्या कार्यक्रमात अनेक विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सायंकाळी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी विध्यार्थ्यांना प्रेरणादायी व्याख्यान दिले. त्यात त्यांनी विध्यार्थ्यांनी स्वतःला ओळखण्याचे आवाहन केले. तसेच करमाळयातील ग्लोबल इन्स्टिट्यूट हे पुणे अथवा लातूरच्या इन्स्टिट्यूट प्रमाणे भासल्याचे बोलून दाखवले.

अध्यक्षीय भाषणात डॉ.रविकिरण पवार म्हणाले की, करमाळा तालुक्याला ज्या प्रकारच्या इन्स्टिट्यूटची गरज होती ती गरज ग्लोबल इन्स्टिट्यूट पूर्ण करत आहे इथे उच्च दर्जाचे शिक्षण व संस्कार दिले जातात म्हणून निश्चितच या इन्स्टिट्यूटचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल.या कार्यक्रमात विध्यार्थीनी निशा कोकाटे व रुपाली पवार यांनी मनोगत व्यक्त केली.
तर प्रा. विशाल वाघमोडे सर यांनी विध्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनण्याचे भावनिक आवाहन केले.समारोपाच्या भाषणात इन्स्टिट्यूटचे प्रमुख प्रा. महेश निकत यांनी बारावीच्या विध्यार्थ्यांना निरोप देत असताना मन भरून येत असल्याचे सांगितले तसेच करमाळा शहरात सुरू असलेल्या या इन्स्टिट्यूट मध्ये उच्च दर्जाच्या शिक्षणा बरोबर त्यांची सुरक्षा व सुसंस्कार याला महत्व देत असल्याचे सांगितले. व उपस्थिती मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इन्स्टिट्यूटचे प्रा. नंदकिशोर वलटे सर यांनी केले.