करमाळासोलापूर जिल्हा

ऊस पुरवठादार शेतक-यांना दिलासा ; ऊस तोडणी मजूरांना ऊस तोडणीसाठी प्रति टन 50 रूपये वाढीव रक्कम देणार

करमाळा समाचार -संजय साखरे


करमाळा तालुक्यातील कमलाभवानी साखर कारखान्याचा सन 2021-22 गळीत हंगाम सुरू असून या हंगामात ऊस तोडणीसाठी ऊस तोड मजूरांकडून ऊस उत्पादकांची होणारी आर्थिक अडवणूकीचा विचार करून 1 एप्रिल,2022 पासून कारखान्याकडे ऊस तोडणी करणा-या ट्रक/ट्रॅक्टर टोळ्या, टायर बैलगाडी व ट्रॅक्टर गाडी मजूरांना रू.50/- प्रति मे.टन इतकी वाढीव तोडणी रक्कम देण्यात येणार असल्याची माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना शिंदे म्हणाले की, आज अखेर ऊसाचे गाळप ६३६८७९ मे .टन झालेले आहे. कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून हंगाम एप्रिल अखेर पर्यंत चालणार आहे. कारखान्याकडे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे गाळप होणे आवश्यक आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली असून उन्हाच्या तीव्रतेमुळे ऊस तोडणी मजूरांची कार्यक्षमता कमी होत आहे. तसेच ऊस तोडणी करणा-या तोडणी मजूर यांचेकडून ऊस तोडणीसाठी शेतक-यांकडून आर्थिक अडवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

तसेच सध्या मोठ्या प्रमाणावर ऊस जळीत करून तोडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कारखान्याने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांचे हिताचे निर्णय घेतलेले असून निरनिराळ्या मार्गाने शेतक-यांना मदत करण्याची भूमिका पार पाडलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतक-यांचे होत असलेले नुकसान टाळणेच्या दृष्टीने 1 एप्रिल,2022 पासून कारखान्याकडे ऊस तोडणी करणा-या ट्रक/ट्रॅक्टर टोळ्या, टायर बैलगाडी व ट्रॅक्टर गाडी मजूरांना रू.50/- प्रति मे.टन इतकी वाढीव तोडणी रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी दिली.

यामुळे ऊस तोडणी मजूरांनी शेतक-यांची आर्थिक अडवणूक न करता कोणत्याही प्रकारच्या वाढीव रक्कमेची मागणी करू नये तसेच ऊस जळीत करून तोडू नये असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे नोंदलेल्या संपूर्ण ऊसाचे वेळेत गाळप होणार असल्याचे संस्थापक-चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी सांगितले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE