वारवारंच्या त्रासाला कंटाळुन शेतकऱ्याची आत्महत्या ; चार जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी- करमाळा समाचार
शेतकरी दादासाहेब पांडूरंग भिसे वय 45 वर्षे धंदा शेती रा.खडकी ता.करमाळा यांनी वारंवारच्या त्रासाला कंटाळुन मौजे खडकी गावाचे शिवारात शेती गट नंबर 43 चे बांधावरील लिंबाचे झाडाला फाशी घेत आत्महत्या केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी साधु गिरी, अनिता तानाजी गिरी, महादेव साधु गिरी, गणेश महादेव गिरी अशी संशयीतांची नावे आहेत.


दि.23/08/2020 रोजी गिरी यांच्या शेताच्या रस्त्याने शेळ्या घेऊन येताना दुचाकी आल्याने शेळ्या शेतात घुसल्या या शेळ्या त्याचे तुरीच्या पिकात गेल्याचे कारणावरुन भिसे यांच्या पत्नी व मुलीला शिविगाळ केली होती तर नंतर पती दादासाहेब पांडूरंग भिसे यांना लिंबाचे काठीने डावे पायावर मारुन तसेच पत्नी व मुलीला असे दोघींना खालच्या दर्जाची भाषा वापरुन शिवीगाळी दमदाटी केली या गोष्टीच्या त्रासाला कंटाळून शेती गट नंबर 43 चे बांधावरील लिंबाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.अशी फिर्याद बानुबाई दादासाहेब भिसे वय 37 वर्षे धंदा घरकाम व शेती रा.खडकी ता.करमाळा यांनी दिली आहे.