करमाळाताज्या घडामोडीराजकीयसोलापूर जिल्हासोलापूर शहर

महायुतीकडुन जवळपास संजयमामा फिक्स ; मामांच्या भुमिकेकडे लक्ष

करमाळा समाचार 

लोकसभेनंतर आता विधानसभेच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडी कडून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नावावर राष्ट्रवादीच्या वतीने शिक्कामोर्तब केला आहे. तर महायुतीच्या माध्यमातून जवळपास विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. पण शिंदे यांचे निकटवर्तीय वेगळ्याच भूमिका मांडत असल्याने शिंदे यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष राहणार आहे.

महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी ज्या पक्षाचा विद्यमान आमदार असेल त्या नेत्याला पुन्हा संधी दिली जावी याशिवाय ज्या अपक्ष आमदारांनी पक्षांना सहकार्य केलं आहे अशाही अपक्ष आमदारांनाही पुन्हा एकदा त्या ठिकाणी संधी दिली जावी अशी भूमिका दोन्ही गटांकडून मांडण्यात आलेली होती व अशा पद्धतीचा फॉर्मला ठरला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात करमाळ्यातून महायुतीकडून संजयमामा शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकतो.

politics

केंद्रामध्ये भाजपची आलेली सत्ता व महाराष्ट्रात सरकारकडून आणलेल्या योजना याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न महायुती कडून केला जाऊ शकतो. याच्यामुळे करमाळा तालुक्यातही जो उमेदवार महायुतीकडून उभा असेल त्याला लाडकी बहीण, भाऊ व इतर योजनांचा लाभ होताना दिसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातही बरेचशी कामे आलेली आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार महायुतीकडून लढल्यास याचा ते लाभ उठवू शकतात.

कागल व इंदापूर सारख्या ठिकाणी अजितदादा पवार गटाने दावा केल्यामुळे त्या ठिकाणचे भाजपाचे पदाधिकारी नाराज होऊन विरोधी गटात जाताना दिसून आले होते. पण तशी परिस्थिती करमाळ्यातून दिसून येत नाही. सध्या महायुतीमधून जरी रश्मी बागल, महेश चिवटे व गणेश चिवटे यांच्या नावाच्या चर्चा सुरू असल्या तरी महायुतीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उमेदवार दिल्यास त्या उमेदवाराचे काम करण्यासाठी सर्व बांधील असतील. शिवाय बंडखोरीची शक्यताही कमी आहे. त्यामुळे विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांना सदरची जागा मिळणे निश्चित मानले जात आहे.

मामांचा कल अपक्ष कडे …
नुकताच कागल येथे बंडखोरी तर इंदापूर या ठिकाणी धक्का बसे अशी परिस्थिती दिसून येत आहे. पण करमाळा विधानसभा मतदार संघात महायुतेकडुन रस्ता मोकळा असताना मामांचा कल हा अपक्ष लढण्याकडे आहे असे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मामा कोणती भुमिका घेतील त्यामुळे महायुती कशा पद्धतीने दिशा ठरवेल यावर बरच काही अवलंबून राहणार आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE