थकीत उस बीलासाठी जामखेडच्या शेतकऱ्यांचा तहसिल कार्यालयात ठिय्या ; प्रशासनाचा मार्ग काढण्याचा प्रयत्न
करमाळा समाचार
कमलाई शुगर कारखाना यांच्याकडील सण 2022 – 23 चे उसाचे बिल न मिळाल्यामुळे जामखेड येथील शेतकऱ्यांनी आज आत्मदहणाचा इशारा दिला होता. प्रशासनाच्या मध्यस्थीने सध्या ते आत्मदहन थांबवून तहसील परिसरात ठिय्या मांडून बसले आहेत. तर याबाबत कारखान्याची बाजू मांडण्यासाठी दोन कर्मचारी तहसील परिसरात आले आहेत. पुढील निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील जवळपास 25 ते 30 शेतकरी हे तहसील परिसरात ठिय्या मांडून आहेत. यापूर्वी त्यांनी आत्मदहन करण्यासाठी इशारा दिला होता. याबाबतची पत्र कमलाई शुगरच्या अध्यक्षांना पाठवले होते. तर 26 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आज प्रहार चे शहराध्यक्ष नय्युम सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली करमाळ्यात तहसिल कार्यालयात थांबले आहेत.

यावेळी त्यांच्यासह अण्णासाहेब उगले, श्रीकांत माने, अक्षय उगले, प्रतीक उगले, विठ्ठल उगले, अशोक माने यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित आहेत. तर तहसिलदार विजयकुमार जाधव मध्यस्थी करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.