करमाळासोलापूर जिल्हा

संगोबा येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे काम चुकीच्या पद्धतीने सुरु – तहसिलकडे तक्रार

करमाळा समाचार

संगोबा ता. करमाळा येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट व चुकीच्या पध्दतीने काम चालू आहे. बंधाऱ्याच्या  खालच्या बाजूने सोलिंगचे काम करताना कोणत्याही प्रकारची खोदाई केली नाही. याउलट तिथे दगड न टाकता फक्त माती व इतर नदी मधीलच मानाड उकरुन त्यात भरले आहे यासारख्या इतर बाबींकडे लक्ष वेधत संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष शशिकांत नरुटे यांनी दिला आहे.

तसेच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूस भिंत बांधायची म्हणून मोठ मोठाले खड्डे खोदून अर्धवट काम ठेवले. जर पाऊस झाला तर पाठीमागे 1998-1999 मध्ये बंधाय्राच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या होत्या तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढे मोठे 55 ते 60 लाख रुपयाचे काम चालू असताना पाटबंधारे खातेचे एकही कर्मचारी अथवा काॅलीटी कंट्रोल कर्मचारी येथे उपस्थित नाही.

शासनाने लाखो रुपयाचे काम मंजूर केले. मात्र येथे काम चालू आहे अशी साधी पाटी पण लावली नाही. हे काम बंद करून जर मंजूर प्लॅन इस्टीमेंट नुसार चालू नाही केले तर संगोबा येथे रास्ता रोको व पाटबंधारे प्रशासनावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE