शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून घ्यावेत:-नितीन झिंजाडे
करमाळा समाचार
वादळी पावसाने बाधित शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून घ्यावेत असे आवाहन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.


याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, राज्यातील वादळी पावसाने थैमान घालत शेतातील पिकांच्या नुकसानीसोबत माणसाची व जनावरांची जीवितहानी झाली आहे. अनेक घरांची पडझड होऊन रस्तेही खराब झाले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून पुन्हा उभे करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुमारे दहा हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन सदर मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही मदत दिवाळी सणापूर्वी देण्याचा शासनाच नियोजन आहे. महसूल,कृषी प्रशासन नुकसानीचे पंचनामे करत आहेत.सदर मदतीपासून कोणीही नुकसानग्रस्त वंचीत राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करून घ्यावेत.यासाठी आपल्या गावातील गाव कामगार तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक किंवा तहसीलदार,कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.
“गावातील ग्रामसेवक,कृषी सहाययक किंवा गाव कामगार तलाठी यापैकी कोणी अधिकारी पंचनामे करण्यास उशीर किंवा टाळाटाळ करत असतील तर माझ्याशी 8378092625 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा”