अखेर पंचायत समीती आरक्षणाचा संभ्रम दुर ; माध्यमातून चुकीची माहीती प्रसारीत
करमाळा समाचार
नुकताच पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षण सोडत दिनांक 10 रोजी सोलापूर येथे पार पडली. या बैठकीला तालुक्यातून अपेक्षित असे उपस्थिती नसल्याने शिवाय माध्यमांमधून वेगवेगळ्या आरक्षण जाहीर झाल्यामुळे लोकांमध्ये आजही करमाळा तालुक्यातील सभापतीच्या जागेबाबत संभ्रम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदरची जागा कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

तालुक्यासह जिल्ह्यातील 11 पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये करमाळा तालुक्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी सदरची जागा राखीव ठेवण्यात आले आहे. वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळी माहिती आल्यामुळे हा संभ्रम कायम राहिला होता. शिवाय सोशल मीडियामध्ये वेगवेगळे दोन्ही मेसेज फिरू लागल्याने नेमकी करमाळा तालुक्यातील जागा कशासाठी आरक्षित आहे हे दिसून येत नव्हते. नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित जागा असली तरी महिला का सर्वसाधारण हा प्रश्न पडलेला.
यावरून विविध चर्चा सुरू होत्या. याची सविस्तर माहिती समोर आणण्यासाठी प्रशासनाकडूनही अपेक्षित असे पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. तालुका पातळीवर वेगवेगळ्या चर्चा असल्याने तीन दिवसानंतर पुन्हा एकदा आरक्षणाची संपूर्ण सूची प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. त्यातून लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर होईल.

१) उत्तर सोलापूर – अनुसूचित जाती महिला
२) पंढरपूर – अनुसूचित जाती
३) अक्कलकोट – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
४)करमाळा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
५) मोहोळ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
६) मंगळवेढा – सर्वसाधारण महिला
७) बार्शी- सर्वसाधारण महिला
८) सांगोला – सर्वसाधारण महिला
९) माळशिरस – सर्वसाधारण
१०) माढा – सर्वसाधारण
११) दक्षिण सोलापूर – सर्वसाधारण
