करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सोलापूर – पुणे मार्गावर मोटारसायकल अपघातात वडगावचा तरुण ठार

करमाळा समाचार

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड येथील उड्डाण पुलावर भरधाव वेगाने मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करताना दुचाकीला जोरदार धडक देऊन अपघात केला. या अपघातात करमाळा तालुक्यातील वडगाव येथील दुचाकी चालकाच्या दोन्ही पायांवरुन ट्रकचे चाक गेले तर तरुण अपघातात ठार झाला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड हद्दीत शनिवारी (दि.६) दुपारी दिड वाजण्याच्या आसपास घडली. दिपक बबन पवार (वय ३४, रा. वडगाव, दक्षिण ता. करमाळा जि. सोलापुर) असे या दुचाकी चालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दुचाकी चालक दिपक पवार हा पुणे येथे उपजीविकेसाठी कुटुंबासह राहतो. कामाला जाण्यासाठी गाडीची आवश्यकता असल्याने तो गावी जुनी गाडी खरेदीसाठी आला होता. शनिवारी माघारी करमाळा वरुन पुण्याला जात होता. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस पोलीस चौकीच्या हद्दीत वरवंड येथील उड्डाण पुलावर आला असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेला मालवाहतूक ट्रक ओव्हरटेक करताना दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.या अपघातात दिपकच्या दोन्ही पायावरुन ट्रकचे चाक गेल्याने गंभीर जखमी झाला.

त्यास यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. दिपकचा भाऊ अशोक पवार यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने ट्रक चालक भारत नामदेव गाडे (रा. बोरीभडक ता. दौंड जि.पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाटस पोलीस करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE