अखेर मनसेच्या रेट्यामुळे स्थानीक कामगारांना न्याय ; कामावर घेण्याचे आदेश
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील लातुर येथे जाणारा भुयारी कॅनल नं 3 येथील दोन वर्षांपासून चे स्थानिक मराठी कामगार यांना परपांतिय ठेकेदार येताच कामावरून घरी पाठवले व परप्रांतीय कामगारांची भरती केली होती त्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळा तालुकाध्यक्ष मा.संजय (बापु)घोलप यांची परत कामावर घेण्यासाठी मदत करावी म्हणून भेट घेतली होती.

तालुक्यातील उजनी जलाशय ते सीनाकोळगाव या बोगद्याचे काम महालक्ष्मी ऍ़न्ड बी.टी.पाटील या कंपनीचे चालू असून दोन वर्षापासून करमाळा तालुक्यातील जेऊर येथे शाफ्ट क्र.3 येथे करमाळा तालुक्यातील स्थानिक मराठी कामगार काम करत होते. त्यामध्ये ड्रायव्हर, मॅकेनिकल, क्रेन ऑपरेटर असे अनेक प्रकारचे कामगार काम करत आहेत त्यांचे ठेकेदार श्री.रेड्डी यांना फेब्रुवारी 2021 पासून काम मिळाले. परंतु श्री.रेड्डी यांनी स्थानिक मराठी कामगारांना कामावरुन कमी करुन परप्रांतिय कामगारांची भरती केली. व जे दोन वर्षापासून काम करत होते त्यांना कामावरुन कमी केले असे आसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना ,करमाळा च्या वतीने मा.दिलीप बापु धोत्रे मनसे नेते व मा. प्रशांत गिड्डे मनसे जिल्हाध्यक्ष सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता भुम व तहसील करमाळा ,यांस 15 /9/ 2021 रोजी स्थानिक कामगारांना कामावरुन घ्यावेत यासाठी निवेदन पत्र दिले होते.

तरी काम हे करमाळा तालुक्यात चालू असून तेथील स्थानिक मराठी कामगांराना परत कामावर हजर करुन घ्यावे व मराठी कामगारांवर जो रोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे तो दुर करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना,करमाळा अंदोलन करेल असा इशारा दिला होता ,तरी त्या निवेदनाची दखल घेत उपअधीक्षक कार्यालय भुम यांना महालक्ष्मी बी टी पाटील कन्स्ट्रक्शन पुणे चे प्रोजेक्ट मॅनेजर यांना 24/9/2021 चे पत्र देऊन जेऊर ता.करमाळा शाॅफ क्र. 3 येथील मराठी स्थानिक कामगारांना परत कामावर हजर करुन त्यांना काम द्यावे असे आदेश देण्यात आले.
तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिलेल्या इशाऱ्यावर मराठी स्थानिक कामगारांना न्याय मिळाला. तरी कामगारांकडून करमाळा मनसे व मा.राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानले.
या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल ,शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि.म.न.वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म.न.वि.से.जि.अध्यक्ष मा.सतिश फंड,जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे ,शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.तेजस राठोड ,शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे,शहर उपाध्यक्ष मा.सचिन कणसे, किरण कांबळे, सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे, अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्निल कवडे उपस्थित होते.