करमाळासोलापूर जिल्हा

यंदाचा आपल्या भागात पहिल्यांदाच पाऊस पडल्याने शेतकरी खुश

करमाळा समाचार 

जिंती आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. कित्येक दिवसापासून दिवसा उकाडा व रात्री गारवा असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाली होती. परंतु आज सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने जिंती आणि परिसरात हजेरी लावल्यामुळे शेतीतील पिकांना जीवदान मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिंती परिसरात पहिलाच पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे. उजनी धरणाची पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. यापावसामुळे बॅकवॉटर च्या शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. हा पाऊस जिंती, कात्रज, को. चिंचोली, टाकळी, खातगाव, भगतवाडी, गुलमवाडी, रामवाडी, भिलारवाडी, कावळवाडी, देलवडी परिसरात पावसाने हजेरी लावली.

आम्हाला आतापर्यंत पाऊस झाला नव्हता दुसरीकडे पडतोय तो आम्ही डोळे पाहत होतो. परंतु आम्हाला आज झालेल्या पावसामुळे आम्ही आनंदी व खूश झालो आहोत.
– राजेंद्र भोसले उर्फ बंटू पाटील
प्रगतशील बागायतदार,
जिंती.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE