अखेर त्या मुलीचा मृत्यू ; बिबट्याने करमाळ्यात घेतला तिसरा बळी
करमाळा समाचार
आज सकाळी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या फुलाबाई अरचंद कोटली रा. दुसाने तालुका साक्री जिल्हा नंदुरबार वय वर्षे 9 या ऊस तोडणी कामगार कुटुंबातील मुलीचा अखेर मृत्यू झाला आहे.

तीच्यावर नरभक्षक बिबट्याने दसकाळी साडे आकराच्या सुमारास हल्ला करून ठार केले आहे. ही घटना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात घडली. त्यांच्या शेतात आज ऊस तोडणी सुरू होती. बाजूलाच ऊस तोडणी कामगारांची मुले खेळत होती. अशातच नरभक्षक बिबट्याने त्या निष्पाप मुलीवर हल्ला केला. यानंतर तिथे उपस्थित ऊस तोडणी कामगारांनी त्याचा पाठलाग केला. त्याला हुसकावून लावले जखमी मुलीला करमाळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे.

आमच्या गृप ची नवीन whats app लिंक
https://chat.whatsapp.com/H5skzBxlrTlAz2RTtfvAQ2