करमाळाकृषीताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

इतर बाजार समीत्यांपेक्षा जादा दर ; करमाळ्यातच उदीड घालण्याचे सभापतींचे आवाहन

प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा बाजार समितीत उडीदाची मोठ्या प्रमाणात आवक : ५५०० ते ६००० दर :- यंदाच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना उडीदाचे मोठे उत्पादन झाले आहे . त्यामुळे बाजार समितीत सध्या दररोज सरासरी ३५०० क्विंटल आवक होत असून उडीदाला चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे . करमाळा बाजार समितीत शेतकऱ्यांचे मालाचे त्वरीत मापे, चोख वजन व २४ तासाच्या आत पट्टीमिळत असल्यामुळे व आसपासच्या बाजार समित्यापेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपला माल बाजार समितीत विक्रीस आणण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती प्रा . शिवाजीराव बंडगर यांनी केले आहे .

आज बाजार समितीमध्ये सौदे सुरु असताना सभापती प्रा . बंडगर, सदस्य संतोष वारे, आनंद कुमार ढेरे , सचिव सुनील शिंदे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळणे साठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन व्यापार्‍यांना केले .

करमाळा बाजार समितीत पारदर्शी सौदे व चोख व्यवहार असल्याने शेतकऱ्यांनी इतर बाजार समितीतील बाजार भावाची चौकशी व खात्री करावी करमाळ्यात निश्चितच जादा दर मिळेल याबाबत शेतकऱ्यांनी निश्चिंत रहावे :

प्रा. शिवाजीराव बंडगर ( सभापती, बाजार समिती करमाळा )

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE