करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अखेर महायुतीची जागा ठरली – करमाळ्यातुन शिवसेनेला जागा सुटली धनुष्यबाण चिन्हावर निवडणुक

करमाळा समाचार 

आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत उत्सुकता लागली होती. पण आता ती उत्सुकता संपली आहे. बागल यांना महायुती करून शिंदे गटाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे करमाळ्यात आता तुतारी, अपक्ष व धनुष्यबाण अशी लढत बघायला मिळेल, तर जरांगे पाटील यांच्या उमेदवारांचे काय होते त्याकडे लक्ष राहील.

लोकसभा निवडणुका नंतर तालुक्यातील राजकीय परिस्थिती पूर्ण बदललेली दिसून आली. लोकसभा निवडणुकीत एकत्र काम केलेले संजयमामा शिंदे व रश्मी बागल यांना विधानसभेत मात्र एकत्र काम करणे टाळले आहे. या दोन्हीही गटाकडून विधानसभेची तयारी केल्याचे दिसून आले. तर लोकसभेत दोन्ही गट एकत्र असताना मोहिते पाटील यांना मिळालेले मताधिक्य व जरांगे फॅक्टर मुळे महायुतीचा उमेदवार ठरल्यास विलंब झाल्याचे दिसुन आले. पण आता दिग्विजय बागल यांची वर्णी या जागेवर लागल्याची दिसून आली आहे.

politics

त्यामुळे करमाळा तालुक्यात आता राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर नारायण पाटील, अपक्ष उमेदवार म्हणून संजयमामा शिंदे व शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार असणार आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान बागल कुटुंबीयांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. परंतु करमाळा तालुक्यातील सदरची जागा ही शिवसेनेकडे असल्याने या ठिकाणी बागल यांनी शिवसेनेतून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE