करमाळासोलापूर जिल्हा

बारामती ॲग्रोला पुढील सुनवाई पर्यत हस्तातरण नाही – मा. आ. पाटील

प्रतिनिधी करमाळा

आदिनाथ कारखान्याच्या हस्तातरनाला तात्पुरती स्थगीती देण्यात आल्याची माहीती माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले आहे. याबाबत नारायण पाटील यांनी एक कोटी रुपये भरले तर आदिनाथ सहकारी तत्वावर चालावा यासाठी कारखान्याच्या वतीने  मुंबई येथील कोर्टात गेल्याने पुढील आदेश होई पर्यत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे सांगितले आहे. तर सहकारी तत्वावर कारखाना सुरु केला जाईल अशी माहीती पाटील यांनी दिली.

बारामती ॲगो च्या उपाध्यक्ष यांनी काही वेळे आधिच कारखाना ॲग्रो चालु करणार असे सांगितले होते. पण आता स्थगीती मिळाल्याने एक प्रकारे बारामती ॲग्रोला धक्का मानला जात आहे. यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले की, मुळात बारामती ॲग्रोचा करार अनाधिकृत असुन साध्या पाचशे रुपयाच्या स्टॅंप वर साडे तिनशे कोटी मालमत्ता असलेल्या कारखान्याचा करार कसा होऊ शकतो. तर शासनाच्या नियमाप्रमाणे एक कोटी भरुन हा कारखाना सुरु करण्यासाठी एक कोटी भरले आहेत.

पुढील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्फत कारखाना सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही दिले. त्यामुळे आता आदिनाथ संचालक मंडळ व बारामती ॲग्रो काय भुमीका घेतील याकडे लक्ष लागले आहे. आज या संदर्भात नारायण पाटील यांनी जेऊर येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी या गोष्टी स्पष्ट केल्या.

आदिनाथ सुरु करत असताना तुटली होती पायातील चप्पल – सांगितला जुना अनुभव
कारखान्यासाठी प्रयत्न करताना स्व. गोविंदबापु पाटील यांनी फिरताना त्यांच्या पायातील चप्पल तुटली तेव्हाच त्यांनी ठरवले जो पर्यत कारखाना उभा राहत नाही तो पर्यत पायात चप्पल घालणार नाही त्यानंतर कारखाना उभा करे पर्यत वीस बावीस वर्ष त्यांनी चप्पल घातली नाही. आज त्या कारखान्याची परिस्थिती बिकट झाली आहे. म्हणुन आता आपण त्यात उतरलो असुन कारखाना अडचणीतुन बाहेर काढुन आज पर्यत नाईलाजाने आपण बाहेर होतो पण आता प्रयत्न करु असे आश्वासनही दिले .

Drt कोर्टाने अदिनाथ कारखान्याच्या विरोधात निकाल दिल्यानंतर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, नानासाहेब लोकरे, लक्ष्मण गोडगे यांच्यासह इतर संचालक DRAT वरिष्ठ न्यायालयात गेले.  यावेळी सदर न्यायालयाने सोमवार पर्यत हस्तातरण करु नये अशा सुचना दिल्याची माहीती चेअरमन धनंजय डोंगरे यांनी दिली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE