अवैध वाळु उपसा, साठा व वाहतुक वेगवेगळ्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल ; ८० ब्रास वाळुसह ट्रक ताब्यात
करमाळा समाचार
करमाळा तहसील कार्यालय व पोलीस ठाणे यांच्या वतीने संयुक्त कारवाई करत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या कारवाईत तब्बल सहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पाच प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरचा प्रकार कंदर भागात घडलेल्या वाळू चोरी प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची कार्यवाही तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वेगवेगळ्या प्रकरणात अवैध वाळु वाहतुक, अवैध वाळु साठा करणे अशा वेगवेगळ्या प्रकरणात शब्बीर मौला मुलाणी, सुनील माने, अशपाक बाबासाहेब मुलाणी व छोटू उर्फ अमर रविराज पराडे सर्व रा. कंदर ता करमाळा, मयूर आश्रुबा गटकळ ता. भूम जिल्हा धाराशिव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गोरक्षनाथ यशवंत ढोकणे ग्राम महसूल अधिकारी कंदर यांनी तक्रार दाखल केली आह
दि १८ जुलै रोजी चार ब्रास वाळू रक्कम रुपये २० हजार व एक निळ्या रंगाचा टॅक रक्कम रुपये तीन लाख असे एकूण तीन लाख वीस हजार रुपयाचा मद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी मयूर आश्रुबा गटकळ ता. भूम जिल्हा धाराशिव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या ट्रक २६ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पाणीपुरवठा पाईपलाईन कंदर येथे वाळू वाहतूक करताना पकडण्यात आला आहे.

तर दि १९ जुलै रोजी दाखल झालेल्या तक्रारीत १६ जुलै २०२५ रोजी महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. यामध्ये उजनी जलाशयाच्याकडे वाळू उत्खनन चालू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाहणी करत असताना कंदर गावठाणाच्या पश्चिमेस पंपिंग हाऊस व उजनी जलाशयाच्या विहिरीलगत काठावर धरणासाठी संपादन झालेल्या क्षेत्रामध्ये यांत्रिक बोटीच्या सहाय्याने अनाधिकृतपणे वाळू उत्खनन केलेले दिसून आले. तसेच चारी बाजूने पाहणी केली असता उजनी जलाशयापासून अंदाजे १५० फूट पाईपने १५ ब्रास वाळू उत्खनन दुपारी बाराच्या सुमारास केलेले दिसून आले. तसेच होळी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील साठवण विहीर पंपग्रह लगत उत्तर बाजूस उजनी जलाशयासाठी संपादक झालेल्या क्षेत्रामध्ये १६ जुलै रोजी अनाधिकृत पणे वाळू उत्खनन केल्याचे दिसून आले. सदरचे वाळू उत्खनन हे अशपाक बाबासाहेब मुलाणी (१५ ब्रास) व छोटू उर्फ अमर रविराज पराडे रा. कंदर ता करमाळा (१५ ब्रास) यांनी साठा केल्याचे समजले तसेच पिकअप मध्ये विनापरवाना वाळू वाहतूक करतो ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच १९ जुलै सकाळी नऊच्या सुमारास कंदर येथील जलाशयाजवळ सुनील दिलीप माने रा. कंदर ता. करमाळा यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाची कोणतीही परवानगी शिवाय जलाशयातून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उत्खन वाळू काढून त्याचा साठा केलेला आहे. यावेळी त्याच्याकडून २५ ब्रास वाळू मिळून आली ७००० रुपये ब्रास प्रमाणे एक लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. व सुनील माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर याच दिवशी सकाळी दहाच्या सुमारास कंदर गावातील शब्बीर मौला मुलाणी याने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा करून विक्री करण्याच्या उद्देशाने साठा केला होता. त्याच्यावर ही करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे यांनी तक्रार दिली आहे. यावेळी त्याच्याकडून वीस ब्रास वाळू प्रत्येकी ७००० रुपये ब्रास प्रमाणे एक लाख ४० हजार रुपयाची वाळू मिळून आली आहे.
