सेतू दाखल्यांसाठी ज्याचा अर्ज आधी त्यालाच दाखला ; वेळेत दाखल केल्यास गैरसोय टळणार
करमाळा समाचार
सेतू दाखल्यांसाठी ज्याचा अर्ज आधी त्यालाच दाखला मिळणार आहे. यामध्ये पंधरा प्रकारचे प्रमाणपत्र आता नियमानुसार मिळणार आहे. विद्यार्थी व पालकांना याचा फायदा होणार आहे. तरी सर्वानी वेळेत अर्ज करा त्यामुळे आपल्या पाल्याची गैरसोय होणार नाही असे आवाहन तहसिल कार्यालयातील महसुल अव्वल कारकुन संतोष गोसावी यांनी केले आहे.

महासेतू विभागात फिफो (फस्ट इन फर्स्ट आऊट) ही प्रणाली वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्याचा अर्ज आधी आला त्यालाच योग्य पडताळणी नंतर दाखला दिला जाणार आहे.

महा सेतू व आपले सरकार तसेच अन्य सहकारी संकेतस्थळावर दाखले मिळण्यासाठी अर्ज केला जातो. त्यानंतर तहसील कार्यालयात हे अर्ज निकाली काढण्यात येतात.
जात प्रमाणपत्र, डोमिसाईल, उत्पन्न प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, नॉन क्रिमिलियर, रहिवासी प्रमाणपत्र अशा एकूण 15 प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी आता फिफो प्रणाली वापरण्यास सुरुवात झाली आहे.