करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

विकास सोसायटीकडून सभासदांना सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा १० टक्के लाभांश वाटप

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील वांगी विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करण्यात आला. सोसायटीच्या १८०० सभासदांना १३,४०,८४३ रुपयांचे वाटप करण्यात आले. संस्थेमध्ये ५ कोटी रुपये ठेवी आहेत. तर ५ .५०कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.अशी माहिती संस्था अध्यक्ष डॉ. विजय रोकडे यांनी दिली .

कार्यक्रमासाठी मकाईचे संचालक युवराज रोकडे युवा नेते दत्ता बापू देशमुख व्हॉइस चेअरमन भैरवनाथ बंडगर सचिव दत्तात्रय शिर्के , माजी चेअरमन साहेबराव रोकडे , गणेश तळेकर सुरेश भानवसे माजी पंचायत समिती सदस्य सुहास नाना रोकडे माजी सभापती लक्ष्मण महाडिक वांगी चे माजी सरपंच विठ्ठल शेळके पैलवान आप्पासाहेब चौगुलेभुजंग जाधव सुरेश रोकडे शंकर जाधव नारायण आरकिले विकास वाघमोडे गणपत कापसे बँक इन्स्पेक्टर शिंदे साहेब संचालक विकास पाटील आप्पासाहेब भोसले दिनकर तात्या रोकडे भाऊसाहेब गोडसे नानासाहेब भानवसे आणि सभासद बंधू उपस्थित होते..

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE