करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा तालुक्यात रात्रीत तीन ठिकाणी जबरी चोरीसह घरफोडी ; एक जण गंभीर जखमी

करमाळा समाचार

जेऊरवाडी( ता.करमाळा) येथे सोमवार ता .10 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तीन ठिकाणी तर जेऊर येथे एका ठिकाणी चोरी झाली आहे. या घटनेने करमाळा तालुक्यात भितीने वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी चोरट्यांनी केलेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आहे. जेऊरवाडी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये घरफोडी करणाऱ्या पाच व्यक्ती असल्याचे दिसून आले आहे.

अंकुश प्रल्हाद शिरसकर( वय 65 )असेच जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अंकुश शिरसकर यांना काठीने मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत असे शिरसकर यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. त्यांच्यावर करमाळा येथे उपचार सुरू आहेत. जेऊरवाडी गावातील अंकुश प्रल्हाद शिरसकर, वामन एकनाथ निमगिरे ,भिकू गजरा निमगिरे या तीन ठिकाणी चोरी झाली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम लांब पास केली आहे.

वामन एकनाथ निमगिरे यांच्या घरी सुरुवातीला घरपोडी करण्यात आली. त्यानंतर भिकू निमगिरे यांच्या घरून घरातील दागिने चोरले आहेत. दोन ठिकाणी घरपोडी केल्यानंतर चोरट्यांनी जेऊरवाडी येथील सावता मंदिराजवळ राहणाऱ्या अंकुश शिरसकर यांच्या घरी केली. यावेळी अंकुश शिरसकर यांची पत्नी शकुंतला शिरसकर यांच्या गळ्यातील व कानातील दागिने काढण्यास अंकुश शिरसकर यांनी विरोध केल्याने चोरट्याने त्यांना काठीने व गजाने जबर मारहाण केली आहे. यात अंकुश शिरसकर यांच्या डोक्याला जबर मारहाण झाली आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

याबाबत शिवाजी अंकुश शिरसकर यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री टिळेकर हे करत आहेत. याच दरम्यान बाळकृष्ण राजाराम निर्मळ वस्ती, जेऊर येथे देखील घरपोडी करण्यात आली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE