अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर चौघांच्या टोळीकडुन जबरदस्तीने चोरी ; आठ लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार ट्रकचा समावेश
करमाळा समाचार
अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर दि17 मध्यरात्री अडीचच्या सुमारास ट्रकचालकांना मारहाण करून चक्क ट्रकचा पळवून नेल्याची घटना घडली आहे यामध्ये अनोळखी चार समान वर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाळाप्पा रामचंद्रआप्पा उपार वय 43 वर्षे धंदा ड्रायव्हर राहणार 4/61 रेकुलगी ता. बिदर जि.बिदर राज्य कर्नाटक यानी फिर्याद दिली आहे.

गाळाप्पा हा आरविंद जमादार रा. मल्लाकेळी ता.जि.बिदर यांचे माल ट्रक गाडी नंबर के ए-39-5314 यागाडीवर 8 दिवसापासून ड्रायव्हर म्हणून काम करतो. त्याच्या सोबत इमामासाब हुशेनसाब सय्यद हा सुध्दा ड्रायव्हर म्हणून काम करतो.

दि.16/04/2021 रोजी 4/00 वाजताचे सुमारास दोघे जण माल ट्रक गाडी नंबर के ए-39-5314 हया मध्ये कागद रददी घेऊन नाशिक येथून मनार्इकेळी ता.जि.बिदर राज्य कर्नाटक येथे निघाले होते
अहमदनगर ते टेंभुर्णी जाणारे डांबरी रोडने जेऊर कविटगाव पास करुन पुढे कंदरगावाकडे जात असताना हॉटेल शिवकृपा जवळ आले असता दि.17/04/2021 रोजी रात्रौ.02/50 वाजताचे सुमारास रस्त्यावर गाडीचे चाक उचलण्याचे जॅक व टामी पडलेली दिसल्याने ते काय आहे हे पाहण्यासाठी माल ट्रक नंबर के ए-39-5314 थांबविला.
त्यावेळी चार अनोळखे इसम त्यापैकी एकाचे हातामध्ये लोखंडी रॉड असलेला इमस अंगावर धाऊन येऊन चालकाच्या डावे हातावर मारहाण केली असता त्यामध्ये डावे हातला मार लागल्याने चालक जखमी झाला. त्यानंतर ओढून ट्रकच्या खाली ओढले व चालकाच्या पाठीवर हाताने लाथाबुक्याने मारहाण केली. त्याच प्रमाणे सोबत असलेल्या इमामासाब हुशेनसाब सय्यद याला ही हाताने मारहाण करुन माल ट्रकच्या खाली ओढून मारहाण केली.
दोघेही रस्त्याचे बाजूला पडलेले. त्यावेळी त्या चार इसमांचे पैकी दोन इसम आले व त्यांनी जवळचे 4000/- रोख रक्कम व आधार कार्ड, मोबार्इल फोन जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर चालकाला ऊसाचे शेतात व जोडीदार इमामासाब हुशेनसाब सय्यद याला केळीच्या शेतात हात-पाय बांधुन टाकले. लगेच माझे ताब्यातील माल ट्रक ही चालु करुन ते चार अनोळखे इसम माझे संमती वाचुन जबरदस्तीने घेऊन गेले आहेत. त्यानंतर दोघांनी हात-पाय बांधलेले यातून सोडवून घेऊन बाहेर आले.