करमाळासोलापूर जिल्हा

उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे जंम्बो covid-19 सेंटर सुरू करण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात जंम्बो कोविड 19 सुरू करण्यात यावे असे निवेदन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे करमाळा नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सविता कांबळे यांनी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

पुढे निवेदनात म्हटले आहे, सध्या कोरोनाविषाणूची गंभीर स्थिती पाहता त्वरित उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे कोविड – 19 सेंटर चालू करावे. सध्या करमाळा शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंना दिवस वाढत आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन विना उपचार घ्यावे लागतात त्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत.

तसेच करमाळा शहरातील डॉक्टर आंबेडकर प्रशाला व यशवंतराव चव्हाण महाविद्यालय दोन्ही covid-19 सेंटर पूर्ण क्षमतेने रुग्णांनी भरलेले आहेत. गरीब व आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्णांची हेळसांड होऊन त्यांच्या जीवाशी खेळले जात आहे. तरी मा. आरोग्य मंत्री यांनी यामध्ये लक्ष घालून करमाळा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये जंम्बो covid-19 सेंटर लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. असे सौ . सविता जयकुमार कांबळे माजी नगरसेविका यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE