फॉर्च्युनर ची नव्या टॅम्पोला समोरुन धडक ; पहाटे तीनच्या सुमारास फिसरे येथे अपघात
करमाळा समाचार
करमाळा बार्शी रस्त्यावर फिसरे गावानजीक आयशर टेम्पो व फॉर्च्यूनर कार गाडी यांची धडक होऊन झालेल्या अपघातात फॉर्च्यूनर चक्काचूर तर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला आहे. सदरचा अपघात गुरुवारी पहाटे तीन च्या सुमारास झाला आहे.

यातील फॉर्च्यूनरचे एअर बॅग उघडल्यामुळे जीवित हानी टळली असली तरी पुढील उपचारासाठी ते करमाळ्यात न थांबता पुण्याच्या दिशेने गेले आहेत. तर टेम्पो चालक किरकोळ जखमी आहे. याप्रकरणी अनोळखी फॉर्च्यूनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत टॅम्पो चालक पुरुषोत्तम भलावी वय ५५, रा. पिंपळगाव ता. जिल्हा भंडारा यांनी फिर्याद दिली आहे.

नव्या आयशर टेम्पोची पोहच करण्यासाठी पुण्याहून टेम्पो लातूरच्या दिशेने जात होता. तर कुर्डूवाडीहून पुण्याच्या दिशेने फॉर्च्यूनर जात असताना गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास दोन्ही गाड्या वेगात असताना एका बाजूने फॉर्च्यूनर गाडीने आयशर टेम्पो चालकाला जोराची धडक दिल्याने यावेळी टेम्पो जाग्यावर पलटी झाला. तर फॉर्च्युनर क्रमांक (एम एच १४ के डब्लु ००४७) हिचे उजवी बाजू पूर्ण चक्काचूर झाला असून एअर बॅग उघडल्याने प्रवासी सुखरूप आहेत अशी उपस्थित लोकांनी पोलिसांना माहीती दिली.
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली व फॉर्च्युनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास प्रदीप चौधरी करत आहेत.