करमाळाक्राईमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

शेतकऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून फसवणुक ; संशयीताने आत्महत्येचा बनाव केल्याचा संशय

करमाळा समाचार 

तालुक्यातील घोटी परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून पैसे दुप्पट करून देतो असे सांगत गावातीलच रेवन्नाथ ननवरे सध्या रा. मांजरी बुद्रुक याने करोडो रुपयांचा गंडा घालून पोबारा केला आहे अशी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेवन्नाथ हा आयटी इंजिनिअर म्हणून नोकरीस आहे. शेअर मार्केटमध्ये त्याने कोट्यावधीची रक्कम गुतवल्याचे भासवले व त्यामध्ये लाखो रुपयाचा परतावा मिळत असल्याचे दाखवून दिले व शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी लोकांना तयार केले. यावेळी गावातील व आसपासच्या शेतकऱ्यांनी मित्र व मित्रांचे नातेवाईक यांच्याकडून लाखो रुपये गोळा केले व ननवरेकडे दिले.

politics

सुरुवातीला त्याने काही परतावाही दिला परंतु नंतर परतावा व मुद्दल रक्कम दोन्हीही देण्यास टाळाटाळ करू लागला. यावरून फसवणूक होत असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे पैशाचा तगादा लावला. यावेळी त्यांनी सदर रक्कम देतो म्हणून सांगितले. पण तो गावी आलाच नाही.

आत्महत्येचा बनाव ..

त्याने आपली गाडी उजनी धरणाच्या जवळ भिमा नदी पुलावर गाडी लावली आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठीही लिहली पण अद्याप त्याचा तपास नाही त्यामुळे त्याने बनाव केला असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तो फसवणुक करुन निघून गेला आहे असून मत झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधारण रक्कम २० ते २५ कोटींच्या घरात असून पोलीस पुढील तपास करत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE