करमाळ्यात शिवजयंतीनिमित्ताने आज महिलांची मोफत थायरॉईड तपासणी शिबीर
करमाळा समाचार
करमाळा शिवसेना युवा सेनेच्या वतीने आज शनिवार दि. 27 मार्च 2021 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वरद हॉस्पिटल, घोलप नगर, करमाळा येथे महिलांची मोफत थायरॉईड तपासणी शिबीर होणार आहे.

ज्या महिलांची थायरॉईड तपासणी होणार आहे त्यांचे रिपोर्ट पुणे येथील प्रसिद्ध रुग्णालयामध्ये तपासणी साठी पाठविण्यात येणार आहे व रिपोर्ट आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील नामांकित डॉक्टर यांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी करमाळा शहरातील महिलांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे.

तपासणी साठी येताना मास्क लावण्यात यावे व सोशल डिस्टन्स चे नियम पाळावेत. तरी सर्वांनी आपल्या परिचयाच्या व ज्यांना गरज आहे अशा लोकांना याची माहिती द्यावी ही विनंती.