करमाळासोलापूर जिल्हा

लॉकडाऊनने गमावल, गावाकडे येऊन कमावल ; पुण्यातुन गावी आलेला तरुणाच्या संघर्षाची कहाणी

तो आला त्याने पाहिले आणि त्याने गावची मने जिंकली………एका जिद्दीने लढला आणि सरपंच झाला.

करमाळा समाचार 

खरंतर लॉकडाऊन् मध्ये नितीन हनुमंत लोंढे नावाचा युवक पुण्याहून बाळेवाडी ला आला.तो पुण्यात एक ड्रायव्हर म्हणून काम करत होता.गावात राहू लागला चांगला स्वभावामुळे आणि गोड बोलण्यामुळे तो सर्वात मिसळून गेला आणि नितीन गावाचा मित्र झाला.मिळेल ते काम करू लागला.शेतात उडीद , तुरी पेरल्या चांगलं पीक झालं.

त्याला मंजूर झालेलं रमाई घरकुल , घर बांधण्यासाठी जागा नसल्यामुळे जुन घर पाडल पण त्याच्या घरकुला ला टेक्निकल अडचण काढून मागच्या कारभारी लोकांनी अडवणूक केली.तरी त्याने जिद्द सोडली नाही.

अशातच गावात निवडणुका लागल्या दलीत वस्तीने एकमुखाने नितीन च्या नावाची शिफारस केली बाकी गावाने ही सूचना मान्य केली.गावातून त्याच्या विरोधात कुणी अर्ज भरायला पुढे आले नाही. मग पुण्यातून एका त्याच्या भावकितल्या माणसाला पटवून विरोधकांनी उभे केले. तरीही गडी मागे हटला नाही. तो प्रचार करत होता. गाठीभेटी घेत राहिला. जवळ पैसा नव्हता कारण लॉकडाऊन मुळे तो गावी आला होता. प्रतिस्पर्धी पॅनल ने पुण्याहून येणाऱ्या मतदारांना अनेक प्रलोभने दाखवली पण सुग्रीव नलवडे आणि हर्षवर्धन नलवडे यांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्याच्या स्वभावामुळे लोकांनी प्रतिस्पर्धी लोकांचे पैसे घेऊनही नितीन लोंढे लाच विजयी केले.

सुदैवाने आरक्षण पडले आणि तो सरपंच झाला.
पण हा माणूस ह्याची अडवणूक जरी झाली असली तरी तो लोकांची अडवणूक करणारा नाही.तो शिकलेला आहे.त्याने जग पाहिलंय, त्याने विकास पाहिलाय.तो सगळ्यांना सोबत घेऊन गाव पुढे नेईल. तो गावाच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर झालाय. लोकशाहीच्या उत्सवात नितीन लोंढे सामील झाला.लोकांसाठी तो झटतोय, तो गावातल्या शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवणार यात शंका नाही.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE