E-Paperकरमाळा

मुंबई ते दुबई निवास कन्हेरे यांच्या चित्रांची परदेशात वाहवा….

दुबई येथील आंतरराष्ट्रीय आर्टफेअर मध्ये हे चित्र प्रदर्शन सुरू असून निवास कन्हेरे यांच्या कलाकृतींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर समावेश होत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे . अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे

दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सतरा ते वीस एप्रिल दरम्यान सुरू असलेल्या वर्ल्ड आर्ट दुबई येथील आर्ट फेअर मध्ये जगभरातील कलाकार आणि आर्ट गॅलरी सहभागी झाल्या आहेत. मुंबई मधील बियॉन्ड आर्ट गॅलरीच्या माध्यमातून निवास यांना सहभागी होण्याची संधी मिळाली आहे, बियॉन्ड गॅलरीचे कार्यकारी प्रमुख विभुराज कपूर यांनी या प्रदर्शनासाठी भारतातील मोजक्या चित्रकारांमधून निवास कन्हेरे यांच्या अमूर्त चित्रांचा समावेश आहे.

करमाळा तालुक्यातील कुंभेजच्या सामान्य शेतकरी कुटुंबातील निवास यांनी चित्रकला विषयात पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून काही काळ चित्रकला शिक्षक म्हणून करमाळा येथे नोकरी केली परंतु नाविन्य व शिकण्याची आवड यामुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट येथून ललीत कला प्रकारात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. अमूर्त चित्र (अबस्ट्रक्ट पेंटिंग) या प्रकारामध्ये त्यांनी आजपर्यंत अनेक अप्रतिम कलाकृती तयार केलेल्या आहेत. यापूर्वी मुंबई येथील जगप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या कलाकृतीना देशी विदेशी कलारसिकांनी मोठा प्रतिसाद दिलेला होता. निवास यांना आपल्या पाच कलाकृतीसह दुबई मधील प्रदर्शनात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

politics

अमूर्त चित्रकलेतून ग्रामीण भागातील प्रज्ञा अभिव्यक्त होतेय. जहांगीर आर्ट गॅलरी येथे झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित असताना निवासची कलाकृती मला प्रत्यक्ष पहायला मिळाली. अंतर्मनातून साकारलेल्या कलाकृतीने प्रस्थापितांचा दबदबा झुगारुन जगात भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. करमाळा तालुक्यातील या भूमीपुत्राचा अभिमान व आनंद वाटतो.
प्रा. गणेश करे पाटील ,
– ⁠अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्था ,पुणे
– ⁠——————————-

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE