रिपाई (आ) च्या वतीने गाडगे महाराज याची जयंती साजरी
प्रतिनिधी सुनिल भोसले
संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती करमाळा गायकवाड चौक येथे नागेशरावजी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन दलित सेनेचे नेते लक्ष्मणराव भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना नागेशराव कांबळे म्हणाले, कोरोना महामारी असल्याने सध्या सोशल डिस्टिंक्शनचे अंतर ठेवून प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी लक्ष्मणराव भोसले,Bदिपक ओहोळ गणेश ननवरे, सूरेश ननवरे,घोडके सर, वैभव परदेशी, बाळासाहेब अडसूळ, भिमराव कांबळे, सुहास ओहोळ, प्रसेनजित कांबळे, यशपाल कांबळे, अमोलशेठ जाधव इ मान्यवर उपस्थित होते.