Uncategorized

न वापरलेल्या बीलावरील स्थीर आकार रद्द करा – धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान

प्रतिनिधी- करमाळा समाचार 

कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर भारत सरकार तसेच महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे मागील चार ते पाच महिने अनेक उद्योग धंदे बंद आहेत. तसे असतानाही व्यवसायिकांनी कारखानदारांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पगारीचीही सोय केलेली आहे. सरकारने तीन महिने वीज बील न देऊन दिलासा दिला असला तरी आता मात्र साधे स्थीर आकार माफ करण्याचेही औदार्य दाखवले नाही, त्यामुळे हा आधीच अडचणीत असलेल्या कारखानदारांवर भार वाढणार आहे. त्यामुळे वीज माफी करो न करो कमीत कमी बंद कारखान्यांचे स्थीर आकार तरी घेऊ नये अशी मागणी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घोलप यांच्यावतीने करण्यात आली आहे.

लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा व्यवसायिक कारखाने उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर संपूर्ण कारखाना बंद काळात ही आपल्या कामगारांच्या पगारी न थकवणार्‍या व्यापारी व्यावसायिकांवर सध्या बँकेचा बोजा तसेच व्यवसाय पुन्हा उभा करण्याची धडपड दिसून येत आहे. त्यातच मागील तीन महिन्यांपासून बिल न पाठवणाऱ्या महावितरण मुळे थोडासा दिलासा मिळाला होता. परंतु अनलॉक सुरू झाल्यानंतर व्यवसाय व व्यापार हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा कारखानेही सुरू झालेले आहेत. त्यातच कर्जप्रकरणे तसेच इतर देणे व भांडवल जुळवताना व्यापाऱ्यांच्या नाकीनऊ येत असताना महावितरणच्या वतीने मागील बिले देण्यास सुरुवात केली आहे. त्यातच बंद काळात अनेकांचे कारखाने पूर्ण बंद असतानाही सरकारने वीज बिल माफ करणे अपेक्षित असताना बिल माफ तर केलेच नाही. उलट बंद काळातील स्थीर आकारही तीन टप्प्यात भरण्यात यावे अशा पद्धतीचे सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे व्यवसायिकांना हातभार लावण्यापेक्षा विजेचा वापर न केलेल्या कारखान्यांनाही स्थिर आकारास भरणे बंधनकारक केल्याने हा एक प्रकारे व्यावसायिकांवर अन्याय आहे. त्यामुळे वीज बिलातून मागील तीन महिन्यांचे स्थिर आकार लावू नयेत व व्यावसायिकांना सहकार्य करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE