गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन
करमाळा समाचार
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकाच मतदारसंघातून एकाच पक्षातून विक्रमी अकरा वेळा आमदार झालेले माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसापासून आजारी असल्याने त्यांच्यावर 16 जुलैपासून सोलापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यांच्यावर पित्ताशयातील खडे यांची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेकदा चढ-उतार सुरू होता काही वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. आज शुक्रवारी दि 30 रोजी सोलापूर येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली.

आबासाहेबांनी वकिली व्यवसाय सोडून सामाजिक कार्याकडे व राजकारणाकडे वळले होते. 1950 पासून विद्यार्थिदशेत असताना त्या आंदोलनात सहभागी झाले होते. 1990, 2004 व 2009 साली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या उज्वल कारकिर्दी मुळे आबांना महाराष्ट्र विधान भवन मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार, वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब पाटील, समाज भूषण पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार, रयत माउली सौ लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार, भारती विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळात 55 वर्षे कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र विधिमंडळ दोन्ही सभागृहात यांचा 2017 मध्ये सन्मान झाला आहे.