करमाळासोलापूर जिल्हा

माझ्या आईनी काय म्हटले असते ? ; २०१३ मध्ये घडलेली घटना आता होतेय व्हायरल

केनियाचा जगप्रसिद्ध धावपटु अबेल मुताई ॲालम्पिक स्पर्धेत शेवटच्या राउंड मधे धावतांना अंतिम रेषेपासुन फक्त काही मीटर दूर होता त्याचे सर्व प्रतिस्पर्धी मागे होते, सुवर्ण पदक जिंकल्यातच जमा होते, सर्व प्रेक्षक त्याच्या नावांचा जल्लोष करीत होते, येवढ्यातच तो गैरसमजातून अंतिम रेषा समजून रेषेच्या एक मीटर आधीच थांबला.

त्याच्या मागुन येणाऱ्या स्पेनच्या इव्हान फर्नांडीसच्या लक्षात आले की चिन्ह न समजल्या मुळे तो थांबला आहे. त्याने ओरडुन अबेल ला पुढे जाण्यास सांगितले पण स्पॅनिश समजत नसल्याने तो हलला नाही शेवटी इव्हान ने त्याला ढकलुन अंतिम रेषे पर्यंत पोचविले, त्यामुळे अबेल पहिला व इव्हान दुसरा आला.

पत्रकारांनी इव्हानला विचारले की तु असे का केलेस? तुला संधी असतांना तु पहिला क्रमांक का घालवलास ?
इव्हान ने सांगितले माझे स्वप्न आहे की एक दिवस आम्ही अशी मानव जात बनु जी एकमेकांना मदत करेल. आणि मी पहिला क्रमांक घालविला नाही.
रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु केनियन स्पर्धकाला ढकलुन पुढे आणलेस?

यांवर इव्हान म्हणाला, तो पहिला आलेलाच होता ही रेस त्याचीच होती!
पण रिपोर्टर पुन्हा म्हणाला, पण तु सुवर्ण पदक जिंकु शकला असतास!

इव्हान म्हणाला, त्या जिंकण्याला काय अर्थ होता? माझ्या मेडलला मान मिळाला नसतां!
माझी आई काय म्हणाली असती ? संस्कार हे पिढी दर पिढी पुढे पुढे जात असतात. मी पुढच्या पिढ्यांना काय दिले असते? दुसर्‍यांच्या दुर्बलतेचा किंवा अज्ञानाचा फायदा न घेता त्यांना मदत करण्याची शिकवण माझ्या आईनी मला दिली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE