राजुरी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गणेश जाधव तर उपाध्यक्षपदी वसंत भोईटे
करमाळा समाचार -संजय साखरे
राजुरी तालुका करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गणेश भाऊसाहेब जाधव यांची तर उपाध्यक्षपदी वसंत लालासाहेब भोईटे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी शाळेच्या शैक्षणिक सुधारणेसाठी व साहित्य खरेदी करण्यासाठी शाळेला 51 हजार रुपयांची तर उपाध्यक्षांनी पंचवीस हजार रुपयांची देणगी जमा केली आहे. तर उर्वरित दहा सदस्यांनी मिळून प्रत्येकी पाच हजार रुपये देणगी दिली आहे. यामधूनच आज जवळपास सव्वा लाख रुपयांचा निधी शाळेच्या सुधारणेसाठी उपलब्ध झाला आहे.

या उपलब्ध निधीतून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी करून अध्यापनाचा दर्जा उंचावता येईल असे मत मुख्याध्यापक संतोष शितोळे सर यांनी व्यक्त केले. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार पालकांच्या वतीने पत्रकार संजय साखरे व प्रताप दुरंदे यांनी केला. तर शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्री शितोळे सर यांनी केला.
यावेळी सरपंच डॉ अमोल दुरंदे, आर आर बापू साखरे ,नवनाथ दुरंदे, सुदाम साखरे ,मा अध्यक्ष भाऊराव साखरे, मारुती साखरे सर, अनिल साखरे ,दत्तात्रय दुरंदे, श्रीकांत शिंदे,श्रीकांत साखरे,मा सरपंच गणेश जाधव, गोकुळ साखरे, रवींद्र गरुड,महादेव दुरंदे, निलेश दुरं दे यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.
