करमाळासोलापूर जिल्हा

दहा रुपये जास्त आकारल्यामुळे ३५ हजारांचा दंड ; ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश

करमाळा समाचार 


बिग बाजार शॉपींग मॉल सोलापूरला ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा झटका दिला आहे. एका ग्राहकाच्या तक्रारीवरून खरेदी केलेल्या वस्तूवर १० रुपये अधिक रक्कम आकारल्यामुळे भरपाई म्हणून ३५ हजार रुपयांचा दंड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या वतीने ठोठावण्यात आला आहे.

सदर तक्राराच्यावतीने ॲड. अँड.रुपेश महिंद्रकर व करमाळ्याचे ॲड. संजय ढेरे यांनी काम पाहिले. याबाबतचा आदेश अध्यक्ष अ. सि. भैसाने, सदस्या सौ. बबिता महंत – गाजरे व सदस्य सचिन पाठक यांच्यावतीने देण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश वेळापुरे हे सोलापूर येथे शासकीय नोकरीत आहेत. ते सात रस्ता सोलापूर येथील बिग बाजार या शॉपिंग मॉल मध्ये २० ऑगस्ट २०२० मध्ये गेले होते तिथे फेविस्टीक चे दोन नग खरेदी करण्यासाठी गेले होते. एका नगाची छापील किंमत वीस रुपये असताना २ नगाचे बिग बाजार कडून ५० रुपये आकारण्यात आले.

ते मूळ किमतीपेक्षा दहा रुपये जास्तीचे होते. सदर बिलावर पाहिल्यानंतर ही बाब लक्षात आली. सदर बिल घेऊन वेळापूरे हे बिग बाजार मध्ये गेले असताना त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी पाठवण्यात आले.

त्यानंतर वेळापुरे यांनी १९ मार्च २० आयोगासमोर तक्रार दाखल केली. यावेळी बिग बाजार च्या वतीने आरोपाचे खंडन करीत खोटा व बिनबुडाचा अर्ज असल्याचे सांगण्यात आले होते. सर्व कागदपत्र व युक्तिवाद ऐकून घेऊन अखेर आयोगाच्या वतीने बिग बाजारला दंड ठोठावण्यात आला. यावेळी तक्रारदार हे शिक्षित व नोकरीत असल्याने सदर बाबींचा मानसिक त्रास व त्याचे निरसन करण्यासाठी वेळ व पैसा सहन करावा लागला.

त्यामुळे तक्रारकर्ते यांना मानसिक त्रास पोटी पाच हजार रुपये व तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये विरोधी पक्षाकडून मिळण्यास आदेश देण्यात आला. तर पंचवीस हजार रुपये ग्राहक कल्याण निधी मध्ये जमा करण्यास सांगितले असे एकूण ३५ हजार रुपयांचा दंड बिग बाजार च्या मॅनेजरच्या नावे ठोठावण्यात आला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE