करमाळ्यातील “या ” योजनेस शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायिनी असलेल्या व साडे- दहाहजार हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आणणाऱ्या दहिगाव उपसा सिंचन योजनेस शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देवुन “स्व बाळासाहेब ठाकरे दहिगाव उपसा सिंचन योजना ” असे नामकरण करावे अशी आग्रही मागणी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांनी केली आहे. शिवसेना युवा सेना संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन व पत्रकार बांधवाच्या सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष व शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना संघटक संजय शिंदे युवा सेना समन्वयक शंभुराजे फरतडे व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या वेळी अधीक बोलताना शाहुराव फरतडे म्हणाले की १९९५ ला युती शासन असताना करमाळा तालुक्यातील सौंदे या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन उजनीचे पाणी पुर्व भागातील दुष्काळी भागात कॅनॉल द्वारे ओळवले तर हा दुष्काळी भाग कायमस्वरूपी बागायत होवुन या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम होतील अशी मागणी करुन योजनेस मंजुरी देण्याची विनंती केली होती. या अनुषंगानेच शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी दुरदृष्टीकोनातुन या योजनेचे महत्व जाणले व तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हि योजना मंजूर करण्याचे आदेश दिले.
युती शासन असताना या योजनेस मंजुरी व निधी मिळाला नंतर आघाडी सरकारच्या काळात हि योजना निधी विना रखडली होती मात्र 2014 ला पुन्हा शिवसेना भाजपा चे सरकार आल्यानंतर या योजनेस निधी मिळाला व आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने या योजनेस वाढीव सुप्रमा मिळाली आहे.
दहिगाव योजना कार्यन्वित झाल्याने कायम दुष्काळी ओळख असलेल्या या भागातील शेतकरी आज उस ,केळी, द्राक्षे, व पाले भाज्या च्या शेती पिकातुन चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यात झालेल्या क्रांती मध्ये दहिगाव योजनाच कारणीभूत आहे व दहिगाव योजनेसाठी शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे व शिवसनेचे योगदान मोठे आहे याची जाणीव ठेवून या दहिगाव योजनेस स्व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे यासाठी मि नामदार एकनाथ शिंदे साहेब व यांच्या मार्फत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मागणी करणार असल्याचे फरतडे यांनी या वेळी सांगीतले आहे.
दहिगाव योजना मंजूर करण्यात शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान आहे या योजनेस साहेबांचे नाव द्यावे हि संकल्पना स्वागताहार्य असुन सर्व पक्षीय नेते देखील यांचे स्वागत करतील करमाळा शिवसेना व सर्व पत्रकार संघ या मागणीसाठी नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्फत प्रयत्न करुन या योजनेस स्व बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पुर्ण करून घेवु
महेश चिवटे
शिवसेना उपजिल्हाप्रमुख