करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

राजुरीत सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा समाचार – संजय साखरे

राजुरी ता करमाळा येथे आज भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी, ग्रामपंचायत कार्यालय राजुरी व श्री राजेश्वर विद्यालय राजुरी याठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम कोरोना चे सर्व नियम पाळून करण्यात आला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथे सेवानिवृत्त सैनिक सुभेदार अनिल साखरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. श्री राजेश्वर विद्यालय राजुरी याठिकाणी मुख्याध्यापक श्री अनिल झोळ सर यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय राजुरी याठिकाणी सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश जाधव, सरपंच डॉ. अमोल दुरंदे, उपसरपंच धनंजय जाधव, ग्रामरोजगार सेवक गोकुळ साखरे, ग्रामसेवक श्री रामेश्वर गलांडे ,नवनाथ दुरंदे ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शितोळे सर व शिक्षक उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE