पोलिसांनी दिलेल्या चुकीच्या वागणुकी विरोधात उद्या जिल्ह्यात सोन्याची दुकाने बंद ; जेऊर येथील घटनेचे पडसाद
करमाळा समाचार
चोरीच्या गुंह्याचा तपास करण्यासाठी आलेल्या सोलापूर पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली जेऊर येथील व्यापाऱ्याला बेकायदेशीररित्या अटक केल्याचे म्हणुन जिल्ह्यातील व्यापारी संघटनेने पोलिसांचा निषेध करुन उद्या जिल्ह्यातील सोने चांदी दुकाने बंद ठेवत निवेदन देण्यात निर्णय घेतला आहे.

जेऊर ता. करमाळा येथे गणेश पंडित यांचे सोने-चांदी चे दुकान आहे. दिनांक १२ रोजी सोलापूर येथील क्राईम ब्रॅंचच्या पोलिसांनी पंडित यांच्या दुकानात कोणतेही कारण न सांगता प्रवेश केला. दुकानातील सामानाची तोडफोड केली.

एखाद्या गुन्हेगाराला वागणूक देतात अशी पंडित यांना वागणूक देऊन शिवीगाळ करत धमकी दिली. दुकानातील सीसीटीव्ही मशीन बेकायदेशीररित्या सोबत घेऊन गेले. तर पंडित यांना भेटण्यासाठी गेलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही हुसकावून लावत त्याच्यावर १२ ते १५ गुन्हे टाकणार आहोत अशी धमकी दिली.
यामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील सुवर्णकार संघटनेने जाहीर निषेध केला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हा अधीक्षक तसेच तालुका पोलीस ठाणे येथे देण्यात आले आहेत.
तर सोलापूर जि. असोशिएशन च्या वतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचा जाहिर तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी उद्या मंगळवार दि १५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व सराफ व सुर्वणकार व्यवसाय बांधवानी आपली दुकाने बंद ठेवावेत व आपले जेऊर येथील सभासद गणेश पंडीत व रविंद्र मालवे यांच्या वर झालेल्या सोलापूर पोलीसांच्या दहशतीच्या कारवाई विरुध्द आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटीत होउन बंद पाळून आपल्या स्थानीक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना काळ्या फिती लावून निवेदन देण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.