DRDO कडुन भारतीयांना आनंदाची बातमी ; कोरोनावर आणले नवीन औषध
वृत्तसंस्था :-
देशातील कोरोना (Covid19) रुग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. मृत्यूचे आकडे विक्रमी पातळीवर पोचले आहेत. या निराशानजक परिस्थितीत संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने (DRDO) भारतीयांना आनंदाची बातमी दिली आहे. डीआरडीओने कोरोनावर 2-डीजी (2-DG) हे नवीन औषध आणले असून, त्याच्या वापरास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. (DCGI has granted permission for emergency use of 2 DG)

डीआरडीओ आणि हैदराबादस्थित डॉ.रेड्डीज लॅबोरेटरीने हे 2-डिऑक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) हे औषध विकसित केले आहे. हे औषध पावडर स्वरुपात सॅशेमध्ये येते आणि पाण्यात मिसळून ते घ्यावे लागते.
या औषधाच्या वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्याच्या वापरास परवानगी देण्याचा निर्णय औषध महानियंत्रकांनी घेतला आहे. हे औषध घेतलेले बहुतांश रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत. या औषधामुळे रुग्णालयात दाखल रुग्ण लवकर बरे होतात आणि त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची फारशी आवश्यकता भासत नाही.

या औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबरमध्ये झाल्या. यात हे औषध कोरोना रुग्णांवर प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे समोर आले. तसेच, औषध घेतलेले रुग्ण लवकर बरे होत असल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या 110 रुग्णांवर तर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 6 रुग्णालयात झाल्या