राजुरी येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न ; 77 जणांचे रक्तदान
प्रतिनिधी – संजय साखरे
दीपावली व श्री राजेश्वर हॉस्पिटल राजुरी च्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त राजुरी तालुका करमाळा येथे आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रुग्णाला वाचवण्यासाठी रक्ताची अत्यंत गरज असते .रक्त कुठलाही प्रयोगशाळेत तयार करता येत नाही, त्यामुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी रक्तदान करणे गरजेचे आहे. याच भूमिकेतून दीपावलीनिमित्त व श्री राजेश्वर हॉस्पिटल राजुरी च्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 77 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा अनोखा संदेश दिला.
रक्त संकलन करण्याचे काम श्री भगवंत ब्लड बँक बार्शी यांनी केले.
या रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर विद्या व डॉक्टर अमोल दुरंदे यांनी केले होते. याकामी संतोष गदादे, प्रवीण दुरंदे, गणेश दुरंदे यांनी सहकार्य केले.
