अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक अत्याचार ; विडिओ तयार करुन जीवे मारण्याची धमकी देत कृत्य
करमाळा समाचार
सध्या करमाळा तालुक्यात काय सुरू आहे. याबाबत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांना कायद्याची तर भीती राहिलीच नाही शिवाय धर्म – देव यांची ही भीती उरलेली दिसून येत नाही, पूर्वी जमिनीवरून फसवणूक केली जात होती. पण आता नवीनच प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. चुलत बहिण भाऊ अनैतिक संबंध, वृद्ध आजोबाचा नाती वर अत्याचार, अल्पवयीन मुला मुलींवर अत्याचार असे प्रकरणी घडू लागले आहेत याला नेमके कोण जबाबदार आहे ? नुकताच असाच प्रकार उघडकीस आला आहे अशा नराधमाला कडक शिक्षा झाली पाहिजे.
तालुक्यातील एका गावात दोन मुलांनी एका अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ तयार केला व मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी मधील एक अल्पवयीन फरार आहे. याप्रकरणाती दुसऱ्या संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरचा प्रकार १० सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , सदर गावातील बारा वर्षीय मुलगा आपल्या आई व भावासोबत गावात राहत आहे. तो दुपारी घराबाहेर पडला असता गावातील एका मंदिराच्या मागे त्याला अल्पवयीन मुलाने बोलवून नेले. त्या ठिकाणी उभा असलेल्या दुसऱ्या व्यक्तींनी संबंधित मुलास अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले. यावेळी दोघांनी मिळून त्याचा व्हिडिओ तयार केला.
त्याशिवाय जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे तो मुलगा शांत राहिला नंतर सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्याने आईला हकीकत सांगितली. त्यावरून संबंधित दोघांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक पोपट टिळेकर हे तपास करीत आहेत.