करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे करमाळ्यात 

करमाळा समाचार

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील कै. खंडू शंकर मोहोळकर यांनी स्थापन केलेल्या एक अग्रगण्य असलेल्या संस्थेचे, साथ आमची झेप तुमची हे ब्रीद घेऊन स्थापन केलेल्या सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्था जंक्शन संचलित महात्मा जोतीराव फुले विद्यालय मोरवड ता. करमाळा या विद्यालयाला स्थापन होऊन २५ वर्षे पूर्ण झाल्याबदल रौप्य महोत्सव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.वा. संपन्न होणार आहे अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ मोहोळकर सर यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री ना.श्री जयकुमार गोरे व प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडामंत्री ना. श्री दत्तामामा भरणे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी करमाळा तालुक्याचे आमदार श्री नारायण आबा पाटील, मा. आमदार श्री संजय मामा शिंदे, मा. आमदार श्री जयवंतराव जगताप, मा. शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत सर , नेचर डिलाईटचे चेअरमन श्री अर्जुन देसाई,

politics

संस्थेचे अध्यक्ष श्री वसंत मोहोळकर, विद्याविकास मंडळाचे सचिव श्री विलासराव घुमरे सर, प्रा. गणेश करे- पाटील, श्री दिग्विजय बागल ,श्री महेश चिवटे ,श्री गणेश चिवटे, प्रा.श्री रामदास झोळ,श्री रमेश कांबळे, श्री मच्छिंद्रनाथ अभंग ,श्री धनंजय नाळे मोरवडचे सरपंच श्री रामहरी कुदळे, उपसरपंच श्री कांतीलाल काळे, तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर , माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .

तरी या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी , पालकांनी,व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आव्हान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नवनाथ मोहोळकर सर व सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE