करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यातील सहकाराच्या अडचणीत आरोग्यमंत्र्यांचे लक्ष पण लोकांच्या आरोग्याचे काय ?

प्रतिनिधी – करमाळा


येथील उपजिल्हा रुग्णालयात अपुरे कर्मचारी संख्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सहकार क्षेत्रात अधिक लक्ष देत असताना आरोग्य क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यापासून जवळपास १३० किलोमीटर अंतरावर असलेल्या करमाळ्यात सिजर तसेच इतर आजारांसाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांची धावपळ होत आहे. आदिनाथ साखर कारखान्यासाठी लक्ष घालणारे मंत्री सावंत (tanaji sawant) हे आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाकडे लक्ष देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्याच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असतानाही उपलब्ध कर्मचारी व साधनसामग्रीवर योग्य पद्धतीने काम सुरू असताना काही लोक राजकीय तसेच वैयक्तिक कारणासाठी उपजिल्हा रुग्णालयाची बदनामी करत असतात. याला कंटाळून संपूर्ण स्टाफ हा आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे गेला व त्यांनी सामुदायिक रजा किंवा राजीनामे यांचा इशारा संजय मामा यांच्याकडे दिला होता. त्यावर शुक्रवारी बैठक घेत मामांनी रिक्त जागा साठी पाठपुरावा तर खोट्या तक्रारीवर लक्ष देत बाजुला उभा राहण्याचे आश्वासन संपूर्ण कर्मचाऱ्यांना दिले आहे.

करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात कर्मचारी व आमदार संजयमामा शिंदे (sanjaymama_Shinde) यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी वारंवार सिजर व इतर विषयांवर उपजिल्हा रुग्णालयाला टार्गेट केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. परंतु उपलब्ध कर्मचारी संख्येनुसार आमचे सर्व कर्मचारी शंभर टक्के प्रतिसाद देत असून त्यानुसार काम केले जात आहे. तरीही या तक्रारी होत आहेत असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर यांनी सांगितले. तसेच रुग्णालयात वाढीव मशीन आल्या असल्या तरी त्या ऑपरेट करण्यासाठी सध्या ऑपरेटर नाहीत. त्याशिवाय भुलतज्ञ नसल्याने सिजरच्या रुग्णांना अडचणी उपलब्ध होत आहे. तरीही आम्ही स्थानिक रुग्णालयात पाठवण्याऐवजी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात रुग्णाला जाण्यास सांगतो अशी माहिती यावेळी गुंजकर यांनी दिली. तर कर्मचारी भरती करणे हा शासनाच्या आख्त्यारित विषय येत असुन शासन यात कमी पडत आहे असे थेट आरोप न करता शासनाकडे बोट दाखवले. नकळत ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडे हा विषय असुन ते लक्ष घालत नाहीत असे दिसते.

श्री आदिनाथसाठी पुढाकार पण आरोग्यसुविधांचे काय ? …

मंत्री तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री होण्यापूर्वीपासुन तालुक्याच्या राजकारणात वैयक्तिक लक्ष देऊन आहे. तर तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत काढण्यासाठी शिवाय चालू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका तानाजी सावंत यांनी पार पाडली होती. परंतु ते ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या आरोग्य खात्याच्या उपजिल्हा रुग्णालयात सात पैकी तीन जागा या रिक्त असल्याने शिवाय भुलतज्ञ नसल्याने सिजर व त्या संबंधित आजारांसाठी रुग्णाला सोलापूर येथे १३० किलोमीटर लांब पाठवलावे लागते. अशा वेळी रस्त्यातही प्रसूती झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे या पद्धतीने सावंत हे सहकार खात्याकडे लक्ष देतात त्यापद्धतीने स्वतःच्या आरोग्य खात्याकडे लक्ष घ्यावी असे अपेक्षित आहे.

karmala news

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE